पैठण, (प्रतिनिधी) : नाथसागर जलाशयाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग देखभालीसाठी तैनात करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या निवारासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दक्षिण जायकवाडी, उत्तर जायकवाडी येथे, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात जायकोचीवाडी, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात चिलेखनवाडी व नांदेड जिल्ह्यात पाटबंधारे खात्यामार्फत वसाहती तयार करण्यात आलेल्या आहेत.या वसाहती निर्माण करण्यास जवळपास ५० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे.
या वसाहती आता काल बाह्य झालेल्या आहेत. या वसाहतीमध्ये पाटबंधारे विभागाचे कर्मचारी अधिकारी व त्याचे कुटुंब वास्तव्य करून राहत आहेत. परंतु अधिकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी आपले निवासस्थान सोडले नाहीत त्या ठिकाणी त्यांनी भाडेकरू ठेवून तसेच काहींनी तर चक्क निवासस्थान विकून पैसे कमावले आहेत. जवळपास तीन पिढ्यापासून या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी, अधिकाऱ्यांचे, कुटुंब व त्यांचे पोट भाडेकरू वास्तव्य करून राहत आहेत.
पाटबंधारे विभागामार्फत या यापूर्वी अनेकदा वसाहतीमध्ये अतिक्रम करून राहणाऱ्या नागरिकांना वसाहती खाली करण्याचे सांगण्यात आले होते परंतु कोणीही निवासस्थाने रिकामे केली नाहीत. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने नवीन शक्कल लढवून या वसाहती कालबाह्य झाल्याचे निमित्त करून व कोणतीही जीवित हानी होऊ नये याचे कारण पुढे करून रविवार पर्यंत सदरलील निवासस्थाने स्वतःहून रिकामी करावीत नसता सोमवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात येईल अशा नोटीसा बजावल्या असल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे. काहींनी निवासस्थाने रिकामी करण्यास सुरुवात केली आहेतर काही पर्याय व्यवस्था करण्यासाठी एमआयडीसी, पैठण परिसरात रूम भाड्याने घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
-- तीन महिन्याची संधी द्यावी नागरिकांची मागणी --
सध्या शैक्षणिक वर्ष सुरू असल्याने या वसाहतीमध्ये वास्तव्य करून राहणाऱ्या नागरिकांचे मुलं मुली पैठण तालुक्यात, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, जालना जिल्ह्यात आदी ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आता अचानक निवासस्थान रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या असल्याने नागरिकांचे धावे दणाणले आहेत. नागरिकांना मुदतवाढ द्यावी. आम्हाला कमीत कमी तीन महिन्याची मुदत देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. पाटबंधारे विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या















